नवी दिल्ली : वेस्ट इंडिज विरुद्ध गुवाहाटी येथे होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. १२ खेळाडूंच्या या यादीत ऋषभ पंत आणि महेंद्र सिंह धोनी यांचा समावेश करण्यात आला आहे. रविवारी हा डे-नाईट सामना होणार आहे.
मागच्यावेळी आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय संघात बदल करण्यात आला होता. त्यामुळे दिनेश कार्तिकला यावेळीही संधी देण्यात आलेली नाही. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात सलग ९५ धावांची खेळी करणाऱ्या ऋषभ पंतला विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय पुढच्या वर्षी वर्ल्ड कप होणार असल्याने त्यापूर्वी ऋषभला जास्तीत जास्त अनुभव मिळावा म्हणूनही त्याला या संघात स्थान देण्यात आलं आहे. शिवाय पुढे मागे धोनीला पर्याय निर्माण व्हावा म्हणूनही ऋषभला भारतीय संघात नियमित करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
असा आहे संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि खलील अहमद याचा समावेश आहे.