तळेगाव : शासनाच्या परिपत्रकानुसार ज्या आदीवासी बांधवांच्या जमिनी विक्री झाल्या आहेत, त्या जमिनी महसूल विभागामार्फत परत मूळ मालकास मिळणार आहेत. याकामी महसूल विभाग व मी स्वतः लक्ष घालणार आहे, असे मत आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, तहसील कार्यालय मावळ, पंचायत समिती मावळ व अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 8) रोजी ग्रामिण रुग्णालय कान्हे येथे मावळ तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, रेशनकार्ड, मतदानकार्ड, आधार कार्ड यांचे वाटप, नवीन नोंदणी त्याचबरोबर वनविभाग, कृषिविभाग, महसूल विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ व माहिती मिळवून देण्यात आली. त्याचबरोबर आदिवासी बांधवांसाठी सर्वरोग आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
यांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे खासदार श्रीरंग बारणे व प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. तसेच मावळ पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांतराम कदम, नायब तहसीलदार गभाले, पंचायत समिती गटविकास अधिकारी निलेश काळे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, कुसुम काशीकर, पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले, जिजाबाई पोटफोडे, साहेबराव करके, दत्तात्रय शेवाळे, महादू उघडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लोहरे, डॉ. गडीकर, युवा मोर्चा सचिव जितेंद्र बोत्रे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत आण्णा ढोरे, तालुका प्रमुख राजू खांडभोर, काँग्रेसचे जेष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माजी सभापती धोंडिबा मराठे, ज्ञानेश्वर दळवी, माउली मामा शिंदे, नंदा सातकर, किरण राक्षे, कान्हे सरपंच राजश्री सातकर, तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक उपस्थित होते.
वडेश्वरमध्ये लवकरच सांस्कृतिक केंद्र
बारणे यांनी शासकीय यंत्रणेने शासनाच्या विविध योजनांचा आदिवासी बांधवांना घरोघर जाऊन लाभ द्यावा अशी सूचना केली. तसेच वडेश्वर येथे आदिवासी बांधवांसाठी खासदार निधीतून लवकरच सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येईल असे आश्वासन दिले. मेळाव्यासाठी मावळ तालुक्यातून 3 हजार आदिवासी समाजबांधव उपस्थित होते. या मेळाव्यात वैयक्तिक लाभार्थ्यांचे 783 अर्ज, रेशनकार्ड 201, जातीचे दाखले नोंदणी 88, जातीचे दाखले फॉर्म भरणे 3000, कृषि विभाग 35, वनविभाग 18, नोकरी व स्वयंरोजगार प्रशिक्षण 93 जणांनी घेतले. आरोग्य तपासणी शिबिरात 177 जणांची तपासणी करण्यात आली.
यांनी केले संयोजन
प्रास्ताविक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वरिष्ठ निरीक्षक चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भोर व वाडेकर यांनी केले. आभार राजेंद्र सातकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन यशस्वी करण्याकरिता आदिवासी विकास प्रकल्प वरिष्ठ निरीक्षक चव्हाण, निरीक्षक खंडारे, विस्तार अधिकारी भवरी, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष बंडाभाऊ ठाकर, अनुलोम मावळ, श्रीकृष्ण देशमुख, राजेंद्र सातकर, विष्णू सातकर, तलाठी भाऊसाहेब भुतेकर, ग्रामविकास अधिकारी धेंडे, प्रथम फाउंडेशन, हॉटेल ताज, गोदरेज, एल अँड टी, वनवासी कल्याण आश्रम कर्मचारी व विध्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.