विकसीत माळी समाजासाठी संघटन मजबूत ठेवा : नारायण नवले

0

रावेर – समाजाचा विकास करायचा असेल तर संघटन मजबूत असले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असल्याशिवाय ध्येय गाठता येत नाही त्यासाठी कठोर परीश्रम घेण्याची तयारी ठेवण्याचे प्रतिपादन विवरे येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिरेमाळी समाजसेवा संघाचे संस्थापक नारायण नवले यांनी केले. विवरे येथे जिरेमाळी समाज सेवा संघ, जळगाव जिल्हा व जिरेमाळी समाज पंच मंडळ विवरे यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आंतरराज्यीय गुणगौरव सोहळा शालिकराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बेंडाळे हायस्कुलच्या सभागृहात झाला. दीपप्रज्वलन संस्थापक नारायण नवले, ह.भ.प.मालती महाराज, छाया नवले, बर्‍हाणपूर माळी समाज अध्यक्ष पांडुरंग सोनवणे, सुरेश इंगळे, विभागीय उपाध्यक्ष नाना सणंसे, बर्‍हाणपूर पंचायत समिती सदस्य ज्योती गोंडेकर व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी केले.

मान्यवरांचा वृक्षरोपे देवून सत्कार
जिल्हा सचिव संजीव डोंगरे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र वाघ, तालुकाध्यक्ष टिकाराम जुनघरे, दिनेश भगत, प्रशांत झगडे, समाधान डोंगरे, संदीप पाटील, युवा तालुकाध्यक्ष भागवत महाजन, पिंटू माळी, विजय पुराणे, धीरज महाजन, विजय नरवाडे, संतोष सपकाळ महिला तालुकाध्यक्ष जिजाबाई डोंगरे, भारती डोंगरे, रुपाली भागवंत, अनिता सावळकर, रमण खोंड, शंकर सणंसे, सोपान डोंगरे, दिवाकर जिरी, हर्षल वाघ, राजु सणंसे, शिवाजी डोंगरे, रामदास मोकासे, विजय डोंगरे यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचा वृक्षरोपे देवून सत्कार करण्यात आला.

गुणवंताचा झाला गुणगौरव
माध्यमिक , उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून नंदकिशोर भागवत, पदमाकर महाजन, उमेश महाजन, शालिकराम पाटील, मालती महाराज, नाना सणंसे, पांडुरंग टेम्प, सुरेश जिरीमाळी, विनायक जिरी, माजी सरपंच आशा नरवाडे, उपसरपंच रवींद्र वासनकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना साईकृपा ऑटोमोबाईल्सतर्फे स्मृतीचिन्ह व चंद्रभागा कंन्स्ट्रक्शनतर्फे रोख बक्षिसे देणयात आली.

स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन
नंदकिशोर भागवत, मालती महाराज, नाना पाटील, सुरेश जिरीमाळी, नारायण नवले आणि शालिकराम पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना शिक्षणाचे महत्व पटवून देत स्पर्धा परिक्षांमध्ये भाग घेण्याचे विदयार्थांना आवाहन केले. कार्यक्रमाला ताराचंद गोंडेकर, किसन महाजन, राहुल सपकाळ, मुरलीधर सावळकर, पोलीस पाटील योगेश नरवाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बहुसंख्येने विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन मयुर खुर्दे, पुजा इंगळे, योगीता जुनघरे तर आभार नाना पाटील, संजीव डोंगरे यांनी मानले.