माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या प्रयत्नांना यश ; मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात विकासकामे होणार
मुक्ताईनगर:- माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील विकास कामांसाठी तीन कोटी 33 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली असून लवकरच कामांना सुरवात होणार असल्याची माहिती माजी मंत्री खडसे यांचे स्वीय्य सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली. खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडील शासन निर्णयानुसार मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील विविध कामांसाठी तीन कोटी 33 लाखांचा निधी मिळाला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात ही कामे होणार
मुक्ताईनगरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये सभामंडप (50 लाख), गोदावरी मंगल कार्यालयामागे सभा मंडप (25 लाख), पिंप्राळा येथे काँक्रीटीकरण (सहा लाख), रीरगाव येथे रस्ता काँक्रिटीकरण (सहा लाख), भानगुरा येथे रस्ता काँक्रिटीकरण (सहा लाख), वढोदा येथे रस्ता काँक्रिटीकरण (25 लाख), काकोडा येथे ग्रांमपचायत कार्यालय बांधणे (20 लाख), सालबर्डी येथे गटार व रस्ते बांधकाम करणे (10 लाख), पिंप्राळा येथे सभागृह बांधणे (10 लाख), सुळे येथे सभागृह बांधणे (10 लाख), नायगाव येथे सभागृह बांधणे (10 लाख) असा एकूण एक कोटी 78 लाखांचा निधी मुक्ताईनगर तालुक्यासाठी मंजूर झाला आहे.
रावेर तालुक्यात ही होणार कामे
ऐनपूर गुजर समाज मंगल कार्यालयानजीक पेव्हर ब्लॉक बसविणे (आठ लाख), म्हस्कावद बु.॥ रस्त्याचे काँक्रिटीकरण (तीन लाख), म्हस्कावद खु.। रस्त्याचे काँक्रिटीकरण (सहा लाख), म्हस्कावदसीम रस्ता काँक्रिटीकरण (तीन लाख), धामोडी येथे रस्ता काँक्रिटीकरण (तीन लाख), रायपूर येथे रस्ता काँक्रिटीकरण (सहा लाख), बोरखेडासीम रस्ता काँक्रिटीकरण (सहा लाख), थोरगव्हाण येथे रस्ता काँक्रिटीकरण (सहा लाख), कोचुर खुर्द येथे रस्ता काँक्रिटीकरण (तीन लाख), सुनोदा येथे रस्ता काँक्रिटीकरण (तीन लाख), मांगी येथे सभागृह बांधकाम करणे (10 लाख) असा मिळून रावेर तालुक्यासाठी 57 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
बोदवड तालुक्यात ही कामे होणार
वाकी येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे (सहा लाख), मुक्तळला रस्ता काँक्रिटीकरण करणे (सहा लाख), विचवे येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे (सहा लाख), शेलवड येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे (15 लाख), मुक्तळला ग्रामपंचायत कार्यालय बांधणे (15 लाख), जलचक्र बु.॥ येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे (सहा लाख), जलचक्र खुर्द येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे (सहा लाख), घाणखेड येथे सभागृह बांधणे (10 लाख), धुनखेड येथे सभागृह बांधणे (10 लाख), राजुर येथे सभागृह बांधणे (10 लाख), गोळेगाव येथे सभागृह बांधणे (आठ लाख) असा मिळून बोदवड तालुक्यासाठी 98 लाखांचा निधी मंजूर झाला असल्याचे योगेश कोलते कळवतात.