विकासाचा वेग कायम राखाः आ. गोरे

0

नूतन पदाधिकार्‍यांचा केला सत्कार

चाकणः नवीन पदाधिकार्‍यांनी विकासाचा वेग कायम राखावा, अशी अपेक्षा खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी रविवारी चाकण येथे व्यक्त केली. खेड पंचायत समितीचे नूतन उपसभापती भगवान पोखरकर, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांचा चाकण ( ता. खेड) येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी आ. गोरे बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष संतोष डोळस, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक संजय आहेर, शेतकरी आघाडीचे एल.बी.तनपुरे, प्रमोद राजे, गोपेश मेहेर, सुनील फणसे, सिद्धार्थ राणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

विविध शासकीय योजना राबविणार
उपसभापती पोखरकर यांनी यावेळी सांगितले की, खेड पंचायत समितीच्या माध्यमातून विविध शासकीय योजना राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर नगराध्यक्ष घोगरे व उपनगराध्यक्ष गोरे यांनी सांगितले की, चाकण न.प.च्या माध्यमातून पुढील काळात शहरातील सर्वच्या सर्व 23 प्रभागांत विकासाची कामे सुरु करण्यात येणार आहे. चाकण नगरपरिषद नवनिर्मित असल्याने पुढील 25 वर्षांचा विचार करून शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भामा आसखेड धरणात पाणी आरक्षण, शहराचा विकास आराखडा अशा मोठ्या योजना आ.गोरे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

शेतकरी संघटनेकडून आभार
रोहकल येथील वीज वितरणच्या अनागोंदी कारभारामुळे विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माय-लेकरांना विधानसभेत तारांकित प्रश्‍नविचारून आणि प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आ. गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.