विकासापेक्षा मंदिर, पुतळ्यांना महत्त्व दिल्याने भाजपचा पराभव; खासदार काकडेंचा घरचा आहेर

0

नवी दिल्ली –राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप पिछाडीवर असल्याने भाजपामधूनच पक्षाच्या धोरणांविरोधात आवाज उठू लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील भाजपची स्थिती फारशी चांगली नाही. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपा पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोलेल्या भाजापाला राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी घरचा आहेर दिला आहे. विकासाचा मुद्दा विसरून राम मंदिर, पुतळे आणि नामांतराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यानेच भाजपाला पराभव पत्करावा लागल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव होईल, हे माहीत होते. मात्र मध्य प्रदेशमधील निकाल धक्कादायक आहे. आमच्या पक्षाने विकासाचा मुद्दा विसरून राम मंदिर, पुतळे आणि नामांतराच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यानेच भाजपाला पराभव पत्करावा लागला,”