विकासाला निधी कमी पडू देणार नाही

0

प्रकाश वाडेकर : विविध कामांचे भुमीपूजन

शेलपिंपळगांव । गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. आ. सुरेश गोरे आणि खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सहकार्यातून आगामी काळात गावातील इतरही सर्व विकास कामे मार्गी लावण्यात येतील. बहुळ ते सिद्धेगव्हाण रस्त्यासाठी 80 तर डबरेवस्ती ते हाबमाळ या रस्त्यासाठी 30 लाख मंजूर झाले असून लवकरच ही कामे हाती घेणार असल्याचे शिवसेना खेड तालुकाप्रमुख प्रकाशदादा वाडेकर यांनी सांगितले. चौदावा वित्त आयोग व ग्रामपंचायत स्वनिधीतून खेड तालुक्यातील बहुळ येथे 22 लाख रुपये खर्चून विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमीपूजन वाडेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

22 लाखांच्या विकास कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयातील जिना व कंपाउंडसाठी 5 लाख, हाबमाळ वस्तीच्या रस्त्यासाठी 4 लाख, दशक्रिया घाटावरील विठोबा डोह येथे महिलांना स्नानगृह बांधण्यासाठी 3 लाख, गावठाण ते महादेव मंदिर रस्त्यासाठी 3 लाख, गावठणामध्ये आर ओ सिस्टम बसविण्यासाठी 3 लाख, साबळेवाडी येथे विहिर खोदण्यासाठी 3 लाख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी 1 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यावेळी उपसरपंच शोभा विजय साबळे, ग्रामविकास अधिकारी अरूण सोळंके, माजी उपसरपंच सुनील साबळे, गणेशदादा वाडेकर, मंगेश साळूंके, वसुधा वाडेकर, सदस्य कोमल साळुंके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मारुती वाडेकर, युवा सेनेचे चिटणीस धनंजय पठारे, नानासाहेब खलाटे, विजयआण्णा वाडेकर, रेखा साबळे, राणी साबळे, विजयराव साबळे, गणेश वाडेकर (माळवाले), शाखाप्रमुख पंडित वाडेकर, रायबा साबळे, मोहनराव वाडेकर, दत्ताशेठ साबळे व इतर ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.