विकास आरखड्या वरुण भाजपा -सेना आमने सामने

0

उल्हासनगर: उल्हासनगर शहरासाठी महाराष्ट्र शासनाने [प्रारूप विकास आराखडा मंजूर केल्यानंतर त्याचे तात्काळ श्रेय घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते आपसात भिडले असताना दूसरी कड़े शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विकास आरखड्या च्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पस्ट करताना सांगितले की झोपड़पट्टी व् बैठ्या चाळीचे नुकसान करून विकास केला जात असाल तर शिवसेना अजिबात खापवून घेणार नाही .तीव्र आंदोलन छेड़ले जाईल असा इशारा दिला आहे .

महाराष्ट्र शासनाने उल्हासनगर साठी प्रारूप विकास आराखडा मंजूर केल्याचे जाहीर करताच त्याचे पडसाद उल्हासनगर शहरामध्ये उमटले आहेत . महापौर मीना आयलानी आणि त्यांचे पति भाजपा चे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या प्रयत्नांमुळेच विकास आराखडा मंजूर झाला असे मेसेज सोशल मीडियावर महापौर समर्थकांमार्फत पसरव्ण्यत येत आहे मात्र या मेसेजला भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शहराचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे . याचे श्रेय सध्या भाजप सोबत असलेल्या ओमी कलानी समर्थक घेत आहेत. शहरातील प्रारूप केवळ आमदार ज्योती कलानी यांच्या अथक प्रयत्नांमुळेच मंजूर झाला आहे असे मत भाजपातील कालानी समर्थक नगरसेवकाने व्यक्त केले .

दूसरी कड़े शहर विकास आरखड्यात भाजपा च्या काही नेत्यांनी जाणीव पूर्वक फेरबदल करून खासकरून झोपड़पट्टी व् बैठ्या चाळी ला टारगेट करून विकास करण्या च्या नावा ख़ाली त्याना उद्ध्वस्त करण्या चा कट करीत असल्याचा आरोप सेना प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला असून मात्र शिवसेना हा सर्व प्रकार खपवून घेणार नाही मुख्यमंत्री श्री फडवनिस यांनी शहराच्या विकासा साठी मंजूर केलेल्या विकास आरखड्या बाबत शिवसेना च्या वती ने अभिनन्दन केले आहे मात्र यात पक्षपात झाला तर सेना स्टाइल ने विरोध केला जाईल असा इशारा देखील देण्यात आले आहे