विकास कामे व मुलभूत सुविधा पुरवण्यास कटिबद्ध

0

चोपडा । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून सर्व साधारण या जागेसाठी मला उमेदवारी देऊन गणातील घोडगांव, मालखेडा, वाळकी, शेंदणी, विटनेर, वढोदा, अंजतिसिम, मोहिदा, दगडी बुद्रुक, अनवर्दे बु., कुसूंबा,वेळोदा आदी गावांची सेवा करण्याची संधी मला माझ्या कमी वयात जनतेची सेवा करण्यासाठी पक्षाने दिल्यामुळे जनतेची सेवा करण्यास सक्षम राहिल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ललित सुभाष बागुल यांनी जनशक्तीशी बोलतांना सांगितले.

राजकीय वारसा असल्याने जनतेशी जुळली नाड

माझे वडील सुभाष जगन्नाथ पाटील यांनी 5 वर्षे वेळादे गावाचे सरपंच पदावर विराजमान असतांना गावाच्या विविध योजना जनकल्याणासाठी आणल्या होत्या. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रेखाताई सुभाष बागुल हे 2000 ते 2005 या दरम्यान पंचायत समितीच्या त्या उपसभापती पदावर होत्या. त्यांनी त्यावेळी शेतावर जाणार्‍या शेतरस्ता हा वेळोदे, अनवर्दे, घोडगांव, विटनेर, वाळकी या गावांमध्ये बनवुन आजही त्या रस्यांवरुन थेट शेतकरी आपले वाहन घेऊन जात आहेत. शेतकरी कुटूंबाशी नाळ जुळली असल्याने शेतकर्‍यांना जवाहर विहीर योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवुन दिला. गरीब गरजु लोकांना घरकुलाचा लाभ मिळवुन दिलेला आहे.

जनतेच्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही; मतदारांना दिले आश्‍वासन

आज मला जे कमी वयात उमेदवारी मिळवुन निवडणूकीत उभा आहे ते आज माझा पुर्वजांच्या आशिर्वादाने तसेच जळगाव जिल्हा पिक फेडरेशनचे व्हा. चेअरमन, वेळोदा विकासोच्या संचालक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गेल्या दोन वर्षापासुन जिल्हा उपाध्यक्षपद भुषवित आहे. तसेच मला उमेदवारी देऊन पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून ती पेलण्याचे काम व्यवस्थित रित्या पार पाडणार आहे. त्यासाठी मला जनतेची साथ हवी असुन निवडून आल्यावर मी संपूर्ण गणातील गावांना हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या व्यवसाय करण्यासाठी स्वावलंबी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम हाती घेणार आहे. पंचायत समितीच्या सर्व योजनेच्या लाभ लोकांप्रयन्त पोहचविणार आहे. सर्व साधारण लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे. मला पक्षातील माझे जेष्ठ मार्गदर्शक माजी विधानसभाध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांचे नेहमीच मला मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वासाला व जनतेच्या विश्वासाला भविष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही व सदैव विकास कामांसाठी प्रयत्नशील राहणार यात तिळमाञ शंका राहणार नाही.