विक्रीकर निरीक्षक परिक्षेत स्वप्निलचे यश

0

अमळनेर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) पदाचा निकाल काल जाहीर झाला. यात अमळनेर येथील रहिवाशी स्वप्नील चंद्रकांत वानखेडे या विद्यार्थीने 200 पैकी 133 गुण मिळवून इतर मागासवर्गीय संवर्गात राज्यात पहिला तर सर्वसाधारण गटात 70 वा आला. जून 2016 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारावर संवर्गनिहाय 181 विद्यार्थीची यादी आयोगातर्फे जाहीर करण्यात आला. यात स्वप्नीलने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या 21व्या वर्षी हे यश संपादन केले. खासगी क्लास न लावता स्व-अभ्यासाने व पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मदतीने त्याने हे उत्तुंग यश संपादन केले.या पार्श्‍वभूमीवर त्याचे वडील चंद्रकांत वानखेडे यांनी स्वप्नीलला पेढा भरवून आनंद साजरा केला. यावेळी पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक विजयसिंग पवार व आर्मी स्कुलचे शिक्षक उमेश काटे यांनी सत्कार केला.

सत्काराप्रसंगी यांची उपस्थिती
यावेळी उज्ज्वला वानखेडे, पूजा वानखेडे, अनिकेत पवार आदी उपस्थित होते. भविष्यात राज्य सेवा परीक्षा देऊन उच्च पदावर जाऊन देशाची प्रशासकीय सेवा करणार असल्याचा मानस स्वप्नील वानखेडे याने व्यक्त केला. या यशाबद्दल अप्पर आयकर आयुक्त संदीप साळुंखे, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष आत्माराम चौधरी, चिटणीस भाऊसाहेब देशमुख, सीसीएमसी सेंटरचे केंद्रसंचालक प्रा. एस.ओ.माळी, युनियन बँकेचे व्यवस्थापक मयूर पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.