पिंपरी-चिंचवड : फुलविक्रेत्यांनी शिल्लक राहिलेली झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावरच फेकून दिली. चिंचवड परिसरातील रस्त्यावर फुले फेकली होती. त्यामुळे अस्वच्छतेमध्ये भर पडली. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दसरा सणामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडूच्या फुलांना 100 रुपये किलोच्या पुढे भाव होता. फुलांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. शहराच्या प्रमुख चौकांमध्ये विक्रेते मोठ्या प्रमाणात दिसून आले.
प्राधिकरण समितीची नाराजी
या विक्रेत्यांनी शिल्लक राहिलेली फुले रस्त्यावरच टाकून दिली. या अस्वच्छतेमुळे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, विजय मुनोत, समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी तत्काळ चिंचवडगाव येथे जाऊन काही फुलविक्रेत्यांना याबाबत समज दिली. विजय पाटील म्हणाले, ‘विक्रेत्यांनी अशा पद्धतीने फुले रस्त्यावर टाकून देणे म्हणजे असभ्य पणाचे प्रदर्शन केल्यासारखे आहे. अशा पद्धतीने प्रमुख चौकांमध्ये फुले अस्ताव्यस्त टाकून निघून गेल्यामुळे महापालिका कर्माचार्यांना दुस-या दिवशी साफसफाई करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा विक्रेत्यांवर महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे’.