नवी दिल्ली – सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच उद्योजकांना अटी शर्थीचे पालन करत उद्योग व्यवसाय करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक प्रो राजेश शर्मा यांनी विजयशॅम्बो इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि इंटिरियर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नवीन वेबसाईट निर्मिती केली आहे. www.vijayshambo.com या नावाने वेबसाईट लॉन्च करण्यात आली असून त्याचे उदघाटन हरियाणा येथील भगत फुल सिंह विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. सुषमा यादव यांच्या हस्ते करण्यात आले. लॉकडाऊनच्या कठीण काळात आर्थिक सुधारणा करण्यासाठी या वेबसाईटमुळे मदत मिळणार आहे.
हे देखील वाचा