विजय चव्हाण यांच्या निधनामुळे जिवाभावाचा मित्र गमावला – अशोक सराफ

0

 मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचे मोठं नुकसान झाले आहे.

”विजय चव्हाण यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये खरोखरच एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भूमिका कोणतेही असो त्यात ते अतिशय चपखलपणे बसायचे. त्यांची अभिनयाची वेगळी अशी शैली होती. मोरूची मावशी’ नाटकातील मावशीच्या भूमिका त्यांनी अजरामर केली. विजय चव्हाण यांच्या जाण्याने माझे वैयक्तित नुकसान झाले आहे कारण ते माझे जवळचे मित्र होते अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते.