विजय चव्हाण यांना मुख्यमंत्र्यानी या शब्दात वाहिली श्रद्धांजली

0

मुंबई-प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 https://twitter.com/CMOMaharashtra/status/1032877779052888064

विजय चव्हाण यांना एक ताकदीचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी रसिक ओळखतातच. मात्र त्याचसोबत त्यांनी गंभीर आशयाच्या भूमिकाही समर्थपणे साकारल्या. मराठी सिनेसृष्टीच्या अलिकडच्या कालखंडातील स्थित्यंतरात श्री. चव्हाण यांनी बहुमूल्य योगदानही दिले होते. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.