नवी सांगवी : विजयशेठ जगताप मित्रपरिवारातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत घोराडेश्वर येथे विविध जातीच्या सुुमारे 500 वृक्षांची लागवड केली. पिंपळे गुरव येथील उद्योजक विजय जगताप यांच्या वाढदिवसनिमित्त फ्लेक्सबाजीवर व्यर्थ खर्च न करता असा उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला. यावेळी विजय जगताप म्हणाले, येणार्या नवीन पिढीने हा आदर्श घेऊन जेथे जेथे जागा उपलब्ध होईल तेथे झाडे लावली पाहिजेत. तसेच फक्त झाडे लावून आपले काम संपत नाही तर झाडांचे जतन केले पाहिजे. तरच भविष्य काळात आपला परिसर व महाराष्ट्र हिरवागार होईल. आपण आपल्या प्रत्येक उपक्रमाची सुरवात किमान एक तरी झाड लावून करावी. यावेळी सुभाष काटे, डॉ. देविदास शेलार, भाऊसाहेब जाधव, सुनील येडे, गणेश सोनवणे, ज्ञानेश्वर खैरे, सुभाष जगताप, सुरेश शिंदे, नाना करंजुले, दत्ता जाधव यांच्यासह सावरकर मंडळ तसेच करिअर अकॅडमीचे सदस्य उपस्थित होते.
मोशी येथे वृक्षारोपण
मोशी : संग्राम सेनानी स्वर्गीय जयनारायण मंगल यांच्या स्मृतीत विश्व पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. लहानग्या आयुवीर मंगल, समृद्धी बगाडिया आणि वैष्णवी काकडे यांच्यासह प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग सचिव अशोक काळभोर आणि प्रवक्ता आयुष मंगल यांनी यांनी यात भाग घेतला. यावेळी अशोक मंगल, पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष गुरुदेव लक्ष्मण वैराळ, श्वेता मंगल, लक्ष्मण राय, मिताली चक्रवर्ती, राजेश नायर, साक्षी राणीम, नेहा मंगल, अक्षांश मंगल, सुरेश कानिटकर, डी एस भामरे , प्रवीण काकडे, रेणुका काकडे, वैष्णवी काकडे, द्वारका दहीगुले, रेखा मोहिते, मालती सांडभोर उपस्थित होते