विजय माल्ल्याच्या लंडनमधील बंगल्यावर टाच !

0

लंडन-भारतीय बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून पलायन केलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्याच्या लंडनमधील अलिशान बंगल्यावर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. स्विस बँकेने माल्ल्यासह त्याची आई आणि मुलाला या बंगल्यातून बाहेर काढण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. सरकारी बँकांप्रमाणेच माल्ल्याने स्विस बँकेकडेही घर गहाण ठेवून कर्ज घेतल्याची माहिती आता समोर आली आहे.

भारतातून फरार झाल्यानंतर तो लंडनमध्ये लपून बसला आहे. नाओमी केंटन येथील रेजेन्ट पार्कमध्ये माल्ल्याची अलिशान हवेली आहे. माल्ल्याने हवेली गहाण ठेवून UBS AG या स्विस बँकेकडून सुमारे 2.4 कोटी पाउंड म्हणजे 195 कोटीचं कर्ज घेतलं होतं. मात्र मुदत संपल्यानंतरही त्याने कर्ज न फेडल्याने हवेली जप्त करण्यासाठी बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी लंडन कोर्टात विजय माल्ल्या, त्याची आई ललिता माल्ल्या आणि मुलगा सिद्धार्थ माल्ल्या यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. 24 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.