मुंबई: गेली ४० वर्षे मराठी प्रेक्षकांच्या आणि चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ कलाकार विजय चव्हाण यांचे आज पहाटे चार वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६३ वर्षी अखेरचा श्वास घेतला. विजू दादा गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अनेक स्तरांमधून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेदेखील ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे