Bullock dies along with mud farmer after electric wire falls on bullock cart यावल : विद्युत तार तुटून बैलगाडीवर पडल्याने शेतकर्यासह एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. ही दुदैवी घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चिखली बुद्रुक शिवारात घटली. यशवंत कामा महाजन (62, रा.चिखली बुद्रुक, ता.यावल) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
विजेच्या तीव्र झटक्याने क्षणात झाले होत्याचे नव्हते
यशवंत कामा महाजन हे चिखली येथे आपल्या परीवारासह वास्तव्यास होते. गुरुवार, 1 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास यशवंत महाजन हे बैलगाडीने चिंखली बुद्रुक शिवारातील आपल्या शेतात रस्त्याने जात असतांना अचानक विद्युत खांब्यावरील तार तुडून बैलगाडीवर पडली. यात विजेच्या तीव्र झटक्याने यशवंत महाजन आणि एका बैलाचा जागीच करुण अंत झाला.
चिंचोली गावात हळहळ
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व ईलेक्ट्रीक वायरमन यांनी धाव घेतली. सुरूवातीला विद्यूत प्रवाह बंद करण्यात येवून महाजन यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी मयत घोषीत केले. या घटनेने चिंचोली गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या संदर्भात फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मुकेश सानप करीत आहे.