Erandole’s wife dies after being touched by electric wires एरंडोल : शहरातील भवानी नगरातील विवाहित महिलेचा गच्चीवर ओले कपडे वाळत टाकताना वीज तारांना स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
शॉक लागल्याने जागीच विवाहितेचा मृत्यू
शहरातील भवानी नगरात रामदास काशीनाथ भोई हे मीराबाई रामदास भोई, सुरेश रामदास भोई यांच्यासह वास्तव्यास असून कुटुंबातील सदस्य कामावर गेल्यानंतर मिराबाई यांनी धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गच्ची गाठली व त्याचवेळी कपडे टाकत असताना त्यांचा नकळता वीज तारांना स्पर्श झाल्यानंतर मीराबाई भोई (70) या गच्चीवर पडल्या. परीसरातील नागरिकांनी आरडा-ओरड केल्यामुळे शेजारी राहणारे अरुण सुखदेव भोई यांच्यासह इतरांनी गच्चीवर धाव घेतली.
एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
संजय भोई, दिलीप भोई व इतरांच्या मदतीने मीराबाई यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील यांनी मीराबाईंना मृत घोषित केले. याबाबत एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.