जळगाव । तालुक्यातील भोलाणे येथेल शौचालयांच्या कामासाठी खोदकाम केलेल्या शोषखडयाचे लोखंडी अँगलने मोजमाप करताना अँगल वीजतारांना स्पर्श झाला असता विजेच्या धक्क्याने किशोर हरी बाविस्कर (वय 30, रा़ गोरगावले बुद्रूक ता़ चोपडा) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजे दरम्यान घटना घडली़ झालेल्या घटनेत दुसरा मजूर संदीप विलास बाविस्कर (28) हा जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
पाच दिवसांपासून सुरु होते काम
चोपडा तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील किशोर बाविस्कर व संदीप विलास बाविस्कर या दोघा मित्रांनी जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे मुरलीधर वासुदेव सपकाळे यांच्याकडे रोजंदारीवर शौचालयांसाठी शोषखडयाच्या कामाचा ठेका घेतला होता़ या कामासाठी किशोर व संदीप हे दोघे पाच दिवसांपासून खोदकाम करीत होते. दोघांनी मिळून वीस फुटाचा खड्डा खोदला़ होता.
मोजमाप करताना लोखंडी रॉडचा वापर
शौचालयांसाठी आवश्यक असल्याप्रमाणे शोषखड्डा खोदला आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी मयत किशोरने खडयाचे मोजमाप करताना लोखंडी रॉडचा वापर केला. तो खड्डयात टाकून मोजमाप करत असताना त्याचवेळी वरील लोंबकळणा:या वीजतारांना रॉडचा स्पर्श झाल्याने किशोरला भीषण विजेचा धक्का बसला़ विजेच्या तारां उघड्या असल्याने रॉडचा तारांना लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर खड्डयातील संदीप या जखमी झाला़
अकस्मात मृत्यूची नोंद
घरमालक असलेले मुरलीधर सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी जखमी झालेल्याना रिक्षातून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या किशोर बाविस्कर ला वैद्यकीय अधिकार्यानी मृत घोषित केल़े.याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद आह़े