चाळीसगाव- शेतात काम करीत असलेल्या तरुणाला विजेच्या खांबाचा विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वलठाण शिवारातील शेतात घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वलठाण किशोर जुगराज जाधव (18) हा वलठाण शिवारातील रमेश मदन राठोड यांच्या शेतात ईतर महीलांसोबत निंदणीचे काम करण्यासाठी असता लोखंडी विजेच्या खांबाजवळ ठेवलेले जेवणाचे डबे घेण्यासाठी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास गेल्यानंतर विजेचा जबर धक्का त्याला बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडण्यापूर्वी लोखंडी खांबाला किरकोळ करंट लागत आहे असे किशोरला सांगण्यात आले होते मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची चर्चा परीसरात होती. तपास पोलीस नाईक दत्तात्रय महाजन करीत आहेत.