विज्ञान प्रदर्शनात परिवर्धा विद्यालयाचे वर्चस्व

0

शहादा । तालुक्यातील परिवर्धा येथे तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन घेण्यात आले. प्राथमिक गटात एकुण 138 तर माध्यमिक गटात 142 उपकरण होती. पृथ्वीराज निकम, योगेश बडगुजर, स्वामिनी खैरनार, शर्मिला पाडवी, अदनान खाटीक, तेजस सावरेक, मेहूल पाटील, अश्‍विनी वळवी यांनी या स्पर्धेत यश मिळविले. उद्घाटन सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. शहादा पं.स सभापती दरबारसिंग गुलाबसिंग पवार, जि.प सदस्य अभिजित पाटील, पंस सदस्य सखुबाई शेमळ, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीपत भाईपटेल, संस्थचे अध्यक्ष गोविंद पाटील, उपाध्यक्ष उध्दव भाई पाटील, संस्थेच्या सचिव मोतनबाई पाटील, मोतनबाई पाटील, मुकेश पाटील, हिरालाल भाई पाटील, एकनाथ भाई रामू पाटील यांची उपस्थिती होती.

विजेत्यांचा गौरव
प्राथमिक गटात परिवर्धा माध्यमिक विद्यालयाचा निकम पृथ्वीराज धनराज याचा उर्जेची बचत या उपकरणासाठी प्रथमकाने गौरविण्यात आले.माध्यमिक विद्यालय खेडदिगर चा बडगुजर योगेश सुरेश ( वहातुक दळणवळण) द्वितीय , नेताजी पब्लिक स्कुल ची स्वामिनी खैरनार तृतीय तर आदिवासी गटातून परिवर्धा माध्यमिक विद्यालयाची शर्मिला रानसिंग पाडवी हीच्या कचरा व्यवस्थापन या उपकरणाची निवड झाली. माध्यमिक गटात इकरा उर्दु स्कुल चा अदनान खाटीक याचा हवा प्रदूषण नियंत्रण सिस्टीम या उपकरणाला प्रथम, महावीर स्कुलचा तेजस दिपक सावरेकर यास द्वितीय, माध्यमिक विद्यालय गोगापुरचा मेहुल छोटुलाल पाटील तृतीय तर आदिवासी गटात प. पु. सती गोदावरी म्हसावद विद्यालची आश्‍विनी विष्णु वळवी हीच्या फवारणी यंत्राची निवड झाली. शिक्षक गटात देखील परिवर्धा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय मंगळे तर माध्यमिक शिक्षक गटात कुबेर ज्यु. कॉलेजचे पुरुषोत्तम पटेल, प्रयोग शाळा परिचर गटात राहुल वसंत चकणे याना तर शैक्षणिक साहित्य गटात जि प शाळा परिवर्ध्याचे शिक्षक ईश्‍वर रोहिदास कोळी यांना मिळाला. माध्यमिक गटाचे परिक्षण एस .जे. पाटील, व्ही. सी. डोळे व आर. एन. सूर्यवंशी यांनी केले माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ . ऱाहुल चौधरी सह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्राथमिक गटाचे परिक्षण आर. एस. पाटील, डी. आर. पाटील. व जे. ए. शिंपी यांनी केले.