मुंबई | सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषद पाणीपुरवठा प्रकरणी अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.
सदस्य अनिल बाबर यांनी आज याबाबतीत प्रश्न उपस्थित केला होता.
डॉ. पाटील म्हणाले,विटा शहराची 10.50 दलघमी पाण्याची मागणी असून त्यांना सध्या 7.50 दलघमी पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या त्यांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो.जुनी पाणीपुरवठा योजना ही 30 हजार लोकसंख्येसाठीची होती मात्र आता वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठयाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.मात्र पाईपलाईन दुरूस्त करणे,जुनी पाईपलाईन बदलणे यासह या नव्या योजनेचा आराखडा घेवून नगराध्यक्ष व लोकप्रतिनीधी यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल.प्रस्तावावर आवश्यक ती कारवाई करून तीन महिन्यात सुधारीत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल.