एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव-शहरातील जुने जळगावात असलेल्या श्री विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाचा मुकुट लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी संशयितांच्या अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या आहे.
जुने जळगावातील श्री विठ्ठल मंदिरातील भगवान विठ्ठलाचा मुकूट शनिवारी सकाळी अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मनोज सुरवाडे, विजय पाटील यांना संशयित बळीराम उर्फ गुड्डू प्रभाकर सोनार रा.अयोध्यानगर याच्याबद्दल माहिती मिळाली. ट्रान्सपोर्टनगर परिसरातील दारूच्या अड्ड्याजवळ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मनोज सुरवाडे, विजय पाटील, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, किशोर पाटील यांच्या पथकाने बळीराम सोनार याला ताब्यात घेतले.