विठ्ठलाच्या दर्शन रांगेत वृध्द महिलेचा मृत्यू

0

शेंदुर्णी। जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील वृध्द महिला अंबिकाबाई भोंडे (वय 75) यांचे खान्देशातील प्रतिपंढरपुर म्हणुन संबोधल्या जाणार्‍या शेंदुर्णी येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री त्रिविक्रम मंदीरात दर्शन घेतांना दर्शन रांगेतच हद्य विकाराच्या धक्काने मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली. पहूर कसबे येथील माजी ग्रामपंचायत सदस्या आंबीकाबाई ह्या गेल्या 40 वर्षापासून प्रत्येक आषाढी , कार्तिकी एकादशीला श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर शेंदुर्णी येथे श्री त्रिविक्रम भगवान यांचे विठ्ठल रुपी दर्शनासाठी येत होत्या.

दरवर्षी प्रमाणे त्या मंगळवारी शेंदुर्णी येथे आषाढी निमित्त आपल्या दोन सुनांसह दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनासाठी उभ्या असतांना अचानकपणे चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या व हृदयविकाराचे धक्क्याने त्यांना जागीच मृत्यु झाला. आषाढी एकादशीला त्रिविक्रमाचे दर्शनासाठी उभे असतांना पवित्र दिवशी पुण्य आत्म्यास मरण आले ह.भ.प कडोबा माळी व भाविकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. परिसरातील भाविक भक्तांमध्ये या घटने विषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.