विठ्ठल भक्तीचे मला प्रदर्शन नको-शरद पवार

0

पुणे: मी पंढरपूरला जाऊन दरवर्षी पांडूरंगाचे दर्शन घेतो, पण त्याचा फोटो एखाद्या पेपरमध्ये यावा, ते मला आवडत नाही, असे सांगत शरद पवार यांनी विठ्ठल भक्तीचे अवडंबर करणाऱ्यांना टोला लगावला. ज्ञानोबा- तुकोबांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित यांनी त्यांचे दर्शन घेतले. या पार्श्वभूमिवर पवार यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याबद्दल चर्चा सुरु आहे.

ह.भ.प. शामसुंदर सोन्नर लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते पुण्यात झाले. या कार्यक्रमावेळी शरद पवार बोलत होते. या वेळी बोलताना पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.