कोलकाता । क्रिकेट हा खेळ जितका मनोरंजक आणि मजेदार आहे तितकाच खतरनाकही आहे. एका चेंडूमध्ये कधी काय होईल हे कोणचं सांगू शकत नाही.क्रिकेटच्या मैदानात कधी वाद होतात तर कधी चेंडू लागून क्रिकेटर जखमी होतो. असाच एक प्रकार शुक्रवारी घडला आणि भारतीय क्रिकेटर थोडक्यात बचावला. शुक्रवारी रणजी करंडक स्पर्धेतील ड गटातील सामन्यात विदर्भाचा फलंदाज आदित्य सरवटे हा थोडक्यात बचावला आहे. बंगाल क्रिकेट अकादमी मैदानात सुरु असलेल्या या सामन्यामध्ये आदित्य सरवटे बॅटींगसाठी मैदानात उतरला. आदित्यने 60 धावा करत मैदानात चांगलं प्रदर्शन दाखवत होता. मात्र, त्याच दरम्यान चेंडू त्याच्या थेट डोक्याला लागला. सुदैवाने आदित्यला मोठी दूखापत झाली नाही.
चेंडू लागल्यानंतर आदित्यने मैदाना सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, थोड्यावेळाने आदित्य पून्हा मैदानात परतला. आदित्यने 93 चेंडूमध्ये 89 धावा बनवले. 89 धावांवर असताना आदित्य झेलबाद झाला.बंगालसोबत खेळण्यात येणार्या या सामन्यामध्ये विदर्भाने आपल्या पहिल्या डावामध्ये सर्व विकेट्स गमावत 499 धावा केल्या. विदर्भाच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 259 धावांची भागिदारी केली. फैज फजलने 142 आणि संजय रामास्वामीने 182 धावा केल्या.