विदेशी बँकांचे कर्ज फेडण्याची नीरव मोदीची तयारी

0

नवी दिल्ली : भारतातील बँकांना हजारो-कोटींचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीने भारतीय बँकांचे कर्ज फेडण्यास नकार दिला असला तरी दोन विदेशी बँकाचे कर्ज फेडण्याची तयारी नीरव मोदीने दाखवली आहे. मोदीने घेतलेल्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नीरव मोदीच्या कंपन्यांनी अमेरिकेच्या एचएसबीसी आणि इस्रायलच्या डिकाऊंट बँकेतून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड व्हावी म्हणून या बँकांनी न्यूयॉर्कच्या कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही या दोन्ही बँकांना मोदींच्या कंपनीकडून कर्ज वसूल करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार बँकांनी हे कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

न्यूयॉर्कच्या आयडीबी बँकेने मोदींच्या तीन कंपन्यांना २०१३ मध्ये १ कोटी २० लाख डॉलरचं कर्ज दिलं होतं. तर एचएसबीसीने २००८ मध्ये १ कोटी ६० लाख डॉलरचे कर्ज दिलं होते. मोदीच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत हे कर्ज खूपच कमी आहे. त्यामुळे यूएस ट्रस्टीने ही वसूली पूर्ण करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे.