विद्यानंदमध्ये रंगले स्नेह संमेलन

0

निगडी : येथील विद्यानंद भवन हायस्कूलच्या स्नेह संमेलनात ‘फील द चेंज’ ही संकल्पना घेऊन साडेचारशे मुलांनी आपली कला सादर केली.
चित्रकार सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी फेडरेशन ऑफ इंग्लिश स्कूल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र सिंग,विंग कमांडर (निवृत्त)पी.व्ही.सी पाटील, सुप्रिया पाटील, विद्यानंद भवनचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील,संचालक डॉ.डी आर करनुरे,डॉ जे.जी पाटील,श्वेता चव्हाण पाटील, अरुणा ंथोनी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका छाया हब्बू यांनी प्रास्ताविक केले. क्रीडाशिक्षक साहेबराव जाधव, शीतल म्हात्रे व सर्व शिक्षिका यांनी नियोजन केले होते. सूत्रसंचालन जयश्री श्रीनिवासन यांनी केले. आभार अवंतिका कुर्रेकर यांनी मानले.