विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे स्नेससंमेलन उत्साहात

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी-  टाटा मोटर्स् एम्प्लॉइज एज्युकेशन ट्रस्टच्या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. ‘आनंद’ अशी थीम असलेल्या या दोन दिवसीय संमेलनात पूर्वप्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केले. माध्यमिक विभागासाठी ‘सत्य’ ही थीम होती. कार्यक्रमाला ‘सीएसआर’चे उपसरव्यवस्थापक अचिंत्य सिंग यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे टेक्निकल सर्व्हिसेसचे सरव्यवस्थापक नितीन टिळक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

ऑक्रेस्टा, गीतगायन, समूहनृत्य व नाटक
विद्यार्थ्यांनी व्हीएन ऑर्केस्ट्रा, गीतगायन, समूहनृत्य सामाजिक समस्यांवर नाटक अशा विविध मनोरंजक कार्यक्रमाद्वारे आपले कलागुण सादर केले. कार्यक्रमाला पाहुण्यांचा व पालकांच्या प्रचंड टाळ्यांच्या कळकळाटाची कौतुकास्पद थाप मिळाली. सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे विविध कलागुण पाहून विद्या निकेतन शाळेचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात अतिशय खंबीरपणे निडरपणे सक्षमपणे उभे राहू शकतात याची खात्री पटली, अशी प्रतिक्रिया पाहुण्यांनी दिली.

पालकांचा प्रचंड प्रतिसाद
पालकांच्या प्रचंड उपस्थितीत झालेल्या स्नेहसंमेलनासाठी मुख्याध्यापिका विद्या गायकवाड, उपमुख्याध्यापिका वसंता रामकृष्णन, माध्यमिक विभाग पर्यवेक्षिका बानी रॉय चौधरी, प्राथमिक विभाग प्रमुख पूनमसिंग यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच साऊंड व चित्रफिती, ध्वनिफिती, म्यूझिक सिस्टिमसाठी शाळेचा माजी विद्यार्थी मिलिंद व मयूर सगरी यांचे विशेष सहकार्य लाभले.