विद्यापीठस्तरीय पथनाट्य कौशल्य कार्यशाळा

0

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्यावतीने 26 व 27 डिसेंबर रोजी धुळे एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, धुळे या महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय पथनाटय कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संलग्नित महाविद्यालय/मान्यता प्राप्त परिसंस्था/शौक्षणिक प्रशाळांनी सहा विद्यार्थ्यांची (तीन विद्यार्थी व तीन विद्यार्थिनी) निवड करुन पाठवावे. निवड करण्यात आलेला विद्यार्थी हा महाविद्यालयात नियमित प्रवेशित असावा. कार्यशाळेचे उद्घाटन 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी धुळे येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य डॉ.अरविंद पां. जोशी (02562 – 238042 मो.नं.9422961972) अथवा विद्यार्थी कल्याण अधिकारी (9665447401 ,9422201855) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे यांनी केले आहे.