विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकार्‍यांची अमरावतीला नियुक्ती

0

कुलगुरू पी.पी. पाटील यांनी दिला निरोप
जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.कर्‍हाड यांची अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नियुक्ती झाल्याने सोमवार, दि.26 नोव्हेंबर रोजी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. डॉ.बी.डी.कर्‍हाड हे चार वर्षापूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वित्त व लेखाधिकारी या पदावर रुजू झाले होते. दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात त्यांची याच पदावर नियुक्ती झाली. त्यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सोमवारी डॉ.कज्हाड यांना कार्यमुक्त करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात त्यांना अधिकाज्यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी डॉ.कर्‍हाड यांनी येथील विद्यापीठात नवीन बरेच काही शिकता आले अशी भावना व्यक्त केली. कुलगुरु प्रा.पाटील यांनी देखील डॉ.कर्‍हाड यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ.कर्‍हाड यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार कुलसचिव भ.भा.पाटील यांनी स्वीकारला आहे. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, दीपक पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, परीक्षा विभागाचे संचालक बी.पी.पाटील तसेच विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते.