जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने 21 फेब्रुवारी रोजी भाषा व साहित्याचा संशोधनाभिमुख अध्यापक, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी विषयांमधील पीएच.डी.पदवीसाठी तयार केले जाणारे शोधप्रबंध गुणवत्तापूर्ण आणि ज्ञानक्षेत्रात भर घालणारे ठरावेत यासाठी उचलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. या एक दिवसीय कार्यशाळेत संशोधन विषयाची निवड, मांडणी, यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
या तज्ज्ञांचा असणार सहभाग
डॉ.दिलीप बारड (भावनगर), डॉ.सु.म.तडकोडकर (गोवा), डॉ.शौलेंद्र लेंडे (नागपूर), प्रा.केशरीलाल वर्मा (छत्तीसगढ), डॉ.उमाशंकर उपाध्याय (पुणे) असे तिन्ही विषयांमधील राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी या विषयांचे पीएच.डी.मार्गदर्शक, संशोधन करणारे व करु इच्छिणारे विद्यार्थी यांच्यासाठी ही कार्यशाळा खुली आहे. कार्यशाळेचे नोंदणी शुल्क रु.पाचशे असून त्यात चहा, नाश्ता, दुपारचे भोजन व कीट उपलब्ध करुन देण्यात येईल. या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन संचालक व मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.म.सु.पगारे, समन्वयक व इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.मुक्ता महाजन आणि हिंदी विभागप्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी यांनी केले आहे.