विद्यापीठाला बहिणाबाईंच्या नावाचे विधेयक परिषदेतही एकमताने मंजूर 

0
नागपूर-जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतच्या विधेयकाला विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. उच्च आणि  तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त येत्या ११ ऑगस्टला हा नामविस्तार सोहळा होणार आहे. या विधेयकावर आमदार नीलम गोऱ्हे, हेमंत टाकले, हरिसिंग राठोड, शरद रणपिसे, चंद्रकांत रघुवंशी, स्मिता वाघ यांच्यासह अन्य काही सदस्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अहिराणी भाषेत या विधेयकावर आपले भाषण केल्याने सभागृह चकित झाले. आमदार स्मिता वाघ यांनी बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला देणे हा आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. जळगाव उत्तर महाराष्ट्र विदयापीठाला ज्येष्ठ कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्याचं सरकारने जाहीर केले तो शिक्षणातील आणि शिक्षणातल्या बहिणाबाई म्हणून एका स्त्री कवियित्रीचा हा जो सन्मान होतोय तो या महाराष्ट्राला निश्चितच भूषणावह आहे असे त्या म्हणाल्या.