विद्यापीठीय पंचवार्षिक बृहत आराखडाबाबत चर्चा

0

जळगाव । उच्च शिक्षणासमोर आज अनेक मोठे आव्हाने उभी असतांनाही त्यातून मार्ग काढत सर्व विद्यापीठांना आपल्या विभागातील गरजा, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि कौशल्ये विकासन यांचा अंतर्भाव असणारा बृहत आराखडा तयार करावा अशी अपेक्षा राज्यस्तरीय विद्यापीठीय बृहत आराखडा छाननी व पुनर्तपासणी समितीची अध्यक्ष आणि माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांचे प्र-कुलगुरू, अधिष्ठाता, नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या चर्चासत्रात व्यक्त केली. बुधवार 11 एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यस्तरीय विद्यापीठीय पंचवार्षिक बृहत आराखडा छाननी व पुनर्तपासणी तज्ज्ञ समिती सदस्य आणि विविध विद्यापीठांमधील प्र-कुलगुरू, अधिष्ठाता, राज्यपालांचे व्यवस्थापन परिषदेवरील नामनिर्देशित सदस्य यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.