विद्यार्थिनींनी जवानांसाठी राख्या पाठवून दिला शुभेच्छा संदेश

0

शिरूर : विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरातील विद्यार्थीनींनी रक्षाबंधनानिमित्त जवानांसाठी राख्या पाठविण्याचे हे द्वितीय वर्ष आहे. या विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या एकूण 182 विद्यार्थीनींनी एकत्रित निधी संकलित करून राख्या खरेदी केल्या. विठ्ठलवाडीचे माजी सरपंच, सेवानिवृत्त कॅप्टन लोभाजी आल्हाट व शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्याध्यापक आर.एस. नजन, ज्येष्ठ शिक्षक एस.जी.थोरात व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन लोभाजी आल्हाट यांना शालेय विद्यार्थीनींनी राखी बांधून, भारत मातेच्या सीमेवर लढणार्‍या आपल्या जवानांना राख्या पाठविण्यासाठी सुपूर्त केल्या.

सीमेवर लढणार्‍या जवानांना बहिणीची आणि राखीची कमतरता भासू नये आणि देश रक्षणाबरोबर बहिणीच्या रक्षणासाठी हा प्रेमाचा धागा विद्यार्थिनींनी पाठवला त्याचबरोबर त्यांनी शुभेच्छा संदेश जवानांपर्यंत पोहचविला.