भुसावळ : तालुक्यातील बोहर्डी जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा मुख्याध्यापक गणेश चुडामण कोलते यास अटक करण्यात आल्यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. पाच दिवसीय कोठडी संपल्यानंतर त्यास शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस .पी. डोरले यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता पुन्हा तीन दिवसांची म्हणजे 27 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड.विजय खडसे यांनी युक्तीवाद केला. तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग करीत आहेत.