विद्यार्थीनींच्या पाससाठी अभाविपचा पुढाकार

0

शिंदखेडा । मानव विकास योजनेअंर्तगत ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थीनींना मोफत पास सेवा कोणत्याही अटी विना देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेतर्फे आगार प्रमुखांना देण्यात आले. दै.जनशक्तिने बुधवार दि 5जुलैच्या अंकात मानव विकास अंर्तगत मुलींसाठी नाहीत पुरेशा बसेस या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीचे गांर्भिय लक्षात घेवून अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने मानव विकास योजने अंर्तगत मूलींना मोफत पास मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थी परीषदेतर्फे आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले.

न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
विद्यार्थीनींना मोफत पास देण्यासाठीच्या सर्व अटी शिथील करून पास देण्यात यावा, पास कोणत्याही बसेस साठी ग्राह्य धरण्यात यावा. विना अट ही सवलत विद्यार्थीनींना लागू करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा परीषदेने दिला आहे. या निवेदनावर प्रांत सहमंत्री धनश्री चांदोडे,शहराध्यक्ष अमोल मराठे,शहर सहमंत्री वैभव चौधरी यांच्या सह्या आहेत. याच आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुरज रविंद्र देसले यांनीही आगार प्रमुख श्रीमती चौरे यांना दिले आहे.