विद्यार्थी गळती रोखण्यासाठी कार्यशाळा

0

जळगाव । जिल्ह्यातील उर्दू शाळामधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यानिकेतन विद्यालयात ही कार्यशाळा पार पडली असून या कार्यशाळेला तीन तालुक्यातील उर्दू शाळांचे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळामध्ये दिवसेंदिवस विद्याथ्र्यांची गळती होत आहे.

यामुळे नुकतेच काही शाळा बंद करण्याचा प्रस्ताव ज़िप़प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनास पाठविण्यात आला आहे. दर वर्षी उर्दू शाळामध्ये विद्यार्थी गळती होत असून शाळा एकत्रिकरण करणे व शाळा बंद करण्याचे प्रस्ताव मांडण्यात येत आहेत़ त्यामुळे विद्याथ्र्यांच्या गळतीचे नेमके कारण काय याचा शोध घेवून त्यावर उपायोजना करण्यासाठी ही मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी खलील शेख व उपशिक्षणाधिकारी डी.डी.देवांग यांनी केंद्र प्रमुखांना गळती रोखण्यासाठीच्या उपायोजना आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाबाबत माहिती दिली. या कार्यशाळेत जळगाव, धरणगाव, एरंडोल तालुक्यातील जिल्हा परिषद, खासगी, महानगरपालिका व नगरपालिकांच्या शाळांचे केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यावेळी उपस्थिती होती़