विद्यार्थी परिषद सचिवपदी अविनाश सांगडे

0

जुन्नर । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी विकास परिषदेच्या आदेशानुसार गुरुवारी (दि.4) विद्यार्थी परिषद सचिव पदासाठी जुन्नरमधील महाविद्यालयामध्ये निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये अविनाश सांगडे या एसवायबीकॉमच्या विद्यार्थ्याची विद्यार्थी परिषद सचिव म्हणून निवड झाली आहे.या निवडणूक प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. जी. पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. व्ही. एच लोखंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने शांततेमध्ये पार पाडण्यासाठी प्रा. तांबे, प्रा. जोशी, प्रा. डॉ. खाडे, प्रा. गोरडे आदींनी मोलाचे सहकार्य केले. अ‍ॅड. संजय काळे व सर्व विश्‍वस्त मंडळ यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषद सचिव सांगडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या.