विद्यार्थी व शिक्षकांकडून तंबाखूमुक्त जनजागृतीपर रॅली

0

पिंपरी :- पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालयात व रुग्णालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी तंबाखूमुक्त घोषणा देत जनजागृतीपर रॅली काढली. यावेळी कर्करोगावर मात करूया- तंबाखूला टाळूया आरोग्य राखूया, धूम्रपान मद्यपान-आयुष्याची धूळधाण, पिंपरी-चिंचवड शहर तंबाखूमुक्त करीन करूया, अशा प्रकारच्या घोषणा देत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू, सिगारेट सोडण्याचे आवाहन या रॅलीतून करण्यात आले.

आज तरुण वर्गासह ज्येष्ठ व्यक्ती धूम्रपान मद्यपानाच्या आहारी गेला आहे. सुपारी, तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेले निकोटिन, टार आणि अन्य रासायनिक घटक मानवी शरीराला अत्यंत घातक असतात. यामुळे व्यक्तीला वेळेतच मुखकर्कपूर्व रोग आणि मुखकर्करोग या दोन्हींवर रोगांवर वेळीच निदान केल्यास रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट यांचे व्यसन सोडणे शक्य आहे. त्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तंबाखू निर्मूलन समुपदेशनाच्या पद्धती निकोटीनची तलफ कमी करण्यास फायदेशीर ठरतात. अशा विविध पद्धतींचा अवलंब करून शहराला तंबाखू आणि मुखकर्करोगमुक्त करणे सहज शक्य आहे.