विद्यार्थी हाच देशाचा भावी आधारस्तंभ

0

मुक्ताईनगर । शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करुन वाटचाल करावी. अपयशाने न खचता, तसेच यशाने हुरळून न जाता सतत कार्यप्रवण राहिल्यास प्रत्येकाची विकासाच्या दिशेने वाटचाल होईल. विद्यार्थी हाच देशाचा भावी आधारस्तंभ असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यावर उद्याचा आदर्श नागरीक होण्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अनुष्का देशमुख यांनी मुक्ताईनगर येथे केले. जे.ई.स्कुल येथे डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी प्राचार्या अनुष्का देशमुख, उपप्राचार्य ऋषीकेश बोराखडे, पर्यवेक्षक वैष्णवी देशमुख, साहील राजेश आंबटवार व टिमने उत्कृष्टरित्या शाळेचे कामकाज पार पाडले.

सरस्वती पूजन
दुसर्‍या सत्रात आयोजित कार्यक्रमात देशमुखसह अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी चालवली शाळा
यावेळी जे.ई.स्कुल व ज्यु.कॉलेजचे प्राचार्य आर.पी. पाटील, सां. मंडळप्रमुख विकास चौधरी, कार्यक्रमप्रमुख सी.डी.पाटील, एस.आर.ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात शाळेतील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडून अध्यापनाचे कार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नुपूर पुराणिक हिने केले. आभार शिक्षक एस.आर.ठाकुर यांनी मानले.