जळगाव । अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे कल वाढावा व आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान प्रसार, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला 15 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला असून त्यापौकी पहिल्या टप्प्यातील रु.3 लाख 45 हजाराचा धनादेश विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. विज्ञान प्रसारचे वौज्ञानिक डॉ.टी.व्ही.व्यंकटेश्वरन यांनी सोमवारी यासंदर्भात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांची भेट घेवून या अनुषंगाने चर्चा केली.नवी दिल्ली येथील विज्ञान प्रसाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध योजना व उपक्रमांचे आयोजन केले जात असते.
3 लाख 45 हजार 600 रुपरांचा धनादेश प्राप्त
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या नंदुरबार जिल्हयातील महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे कल अधिक वाढावा, संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान प्रसारच्या वतीने अनुसूचित जमातीच्या नंदुरबार जिल्हयातील 100 विद्यार्थ्यांसाठी 15 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यापौकी 3 लाख 45 हजार 600 रुपयांचा धनादेश विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. विज्ञानाच्या प्रवाहात समावेशकता वाढावी यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्याथ्र्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विविध व्याख्याने, नामांकित उद्योगांना भेटी, कौशल्य विकसन आदी उपक्रम या योजनेतंर्गत राबविले जाणार आहेत. सुझलान, सोलार पार्क, कृषि विज्ञान कद्र, नंदुरबार, बायफ नंदुरबार या उद्योगांना संस्थांना विद्यार्थ्यांसह भेटी दिल्या जातील. विज्ञान प्रसार कद्राचे वैज्ञानिक (एफ) डॉ.टी.व्ही.व्यंकटेश्वरन यांनी सोमवारी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याशी या योजनेच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी या योजनेचे प्रमुख अन्वेषक तथा भौतिकीयेशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस.टी.बद्रे, कुलसचिव भ.भा.पाटील उपस्थित होते.