विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन व केकी मूस कला दालनास भेट

0

अश्वमेध पब्लिक स्कुल टाकळी प्र.दे. येथील तिसरीच्या विद्यार्थी भारावले

चाळीसगाव – तालुक्यातील टाकळी प्र.दे.च्या अश्वमेध पब्लिक स्कुलच्या तिसरीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चाळीसगाव येथील के.के मूस कलादालनमध्ये नेण्यात आली होती. मुलांमध्ये कलाविषयाशी जिज्ञासा व आवड निर्माण व्हावी या हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बी.ए.गायकवाड यांनी विद्यार्थाना जगप्रसिद्ध चित्रकार के.की. मूस यांच्या जीवनचारित्र्याबद्दल माहिती दिली. यावेळी संस्थेचे ग्रंथपाल एम.ए.घाटे तसेच शाळेतील वर्गशिक्षक रोहित वाघ, अजित राठोड, याद्नि अस्मार, ममता बोरसे, शीतल पाटील हे उपस्थित होते.

चौथीच्या विद्यार्थ्यांना पोलीस विभागाची दिली माहिती
चौथीच्या विद्यार्थाना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेटी साठी नेले असता विद्यार्थाना पोलीस म्हणजे नेमके काय असते तसेच त्यांचे कार्य कोणते असते याचे सविस्तर माहिती पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष रोही, पोउनि युवराज रबडे, गोपनीय शाखेचे गणेश पाटील यांनी दिली. यावेळी विद्यार्थाना पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या तक्रारीचे, भांडण, चोरी अनेक गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना कश्या प्रकारे शिक्षा देण्यात येते, याची माहिती दिली. तसेच विद्यार्थाना पोलीस स्टेशन मार्फत कॅडबरी देखील वाटण्यात आली. याप्रसंगी व्यवस्थापक अधिकारी पियुष गुप्ता यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोनि रामेश्वर गाडे पाटील यांचे आभार व्यक्त केले. तसेच रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व शाळेचे शिक्षक योगराज पाटील, राहुल पाटील, योगेश कुलकर्णी, मनेष शिरसाठ आदी उपस्थित होते.

-फोटो आहे