विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा -यावलमध्ये युवा सेनेची मागणी

0

यावल- महाराष्ट्र शासनाने अलीकडे दुष्काळ म्हणून 180 तालुके जाहीर केले असून दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागधी यावल तालुका युवा सेनेतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करावे तसेच त्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, सर्वच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अजून जमा झालेली नाही ती तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, असे निवेदनाद्वारे नमूद करण्यात आले आहे.

दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी युवा सेना शहर प्रमुख सागर देवांग, उपशहर प्रमुख प्रवीण बडगुजर, सागर बोरसे, सुनील कुंभार, सिद्दीक कच्ची, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, उपशहर प्रमुख संतोष धोबी, आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तडवी, उपशहर प्रमुख मोसीम खान, नयन करांडे, वैभव कोळी, सागर मोरे, कमलेश चौधरी, गिरीश बडगुजर, विशाल बारी आणि शिवसेना व युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.