जळगाव। शिक्षणासाठी शहरात खोली करून राहणार्या दोन विद्यार्थ्यांचे पाच मोबाईल व एक लॅपटॉप असा एकूण 38 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शु्क्रवारी सकाळी 6 ते 7.45 वाजे दरम्यान कोल्हेनगरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील जयेश राजेंद्र पवार व किशोर महाजन हे दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने त्यांनी कोल्हेनगर परिसरात भाड्याने खोली घेतली आहे. गुरूवारी रात्री विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे रात्री त्यांची झोप झाली नाही. तर शुक्रवारी पहाटे पुन्हा वीज गुल झाल्यामुळे उकाडा जाणवत होता. थंड हवा मिळण्यासाठी त्यांनी सकाळी 6 वाजता खोलीचा दरवाजा उघड ठेवला होता. त्यानंतर दोन्ही पुन्हा झोपी गेले. सकाळी 7.45 वाजता त्यांना जाग आल्यानंतर खोलीत ठेवलेले पाच मोबाईल व एक लॅपटॉप लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्यांनी घरात, शेजारी शोधा-शोध केली परंतु मोबाईल व लॅपटॉप मिळून आले नाही. तपास गोपाल चौधरी तपास करीत आहेत.