मावळ : चिखलसे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कामशेत केंद्राची 5 वी शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ. सुनिल साठे यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण व सर्जनशीलतेला वाव देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करावा. तसेच अभ्यासपूरक विविध उपक्रम व प्रकल्प राबवावेत असे आवाहन शिक्षकांना केले.
हे देखील वाचा
अध्ययनस्तर निश्चितीवर मागदर्शन…
परिषदेचे उद्घाटन सरपंच मनोरमा साळवे, माजी उपसरपंच बाळासाहेब काजळे यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापिका ढमाले यांनी प्रास्ताविक केले. विषय तज्ज्ञ आरती कुंडले यांनी अध्ययनस्तर निश्चित करण्याबाबत मार्गदर्शन केले. संजय जगताप यांनी प्रश्न तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षकांना केले. कामशेत केंद्रातील सर्व शिक्षक तसेच चिखलसे शाळेचे बांदल मॅडम, उपाध्ये, शिखरे, सरपंच मनोरमा साळवे, माजी उपसरपंच बाळासाहेब काजळे, विजय काजळे, शिवशंकर काजळे, संदीप काजळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरत काजळे, सदस्य पुनम खानेकर, बाळासाहेब साठे, संपत साळवे, सोमनाथ चौधरी, शिल्पा चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.