स्थायी समितीत दिली कार्योत्तर मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना महापालिकेच्यावतीने सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. या पुस्तके खरेदीसाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाला 21 लाख 80 हजार रूपये आगाऊ देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना महापालिकेच्यावतीने सन 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
मागणी नोंदवावी
माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक विद्यालयांना क्रमिक पुस्तकांची मागणी नोंदविण्याबाबत कळविले. 18 माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी आपली मागणी नोंदविली. या मागणीनुसार, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) इयत्ता पाचवी ते सातवी आणि नववी ते दहावीच्या मराठी, इंगजी आणि उर्दू माध्यमासाठी एकूण 39 हजार 948 पुस्तकांकरिता 21 लाख 80 हजार रूपयांची आगाऊ मागणी केली आहे. ही खरेदी थेट पद्धतीने निविदा न मागविता, करारनामा न करता केली जाणार आहे.
शिक्षण विभगाकडील सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात मोफत क्रमिक पुस्तके या लेखाशिर्षावर 25 लाख रूपये तरतूद आहे. त्यातील 21 लाख 80 हजार रूपये राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाला आगाऊ देण्यात आले. त्याला नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत कार्योत्तर मान्यता देण्यात दिली.