नंदुरबार । तालुक्यातील काकर्दे येथे जिल्हा परिषदेच्या पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात आला.
योजना यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल माळी, उपाध्यक्ष सोपानदेव चव्हाण, सदस्य प्रदीप सोनार तसेच ग्राम पंचायत सर्व पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक उमेश बेडसे, जेष्ठ शिक्षक साहेबराव रजाळे , भिमसिंग वसावे यांनी कामकाज पाहिले.