विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल वाटप

0

हिंगोणी बु । येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून अ‍ॅटी करप्शन आणि क्र्राइम कंट्राल कमिटीचे जिल्हाध्यक्ष कुंदन भिमराव पाटील यांनी पाटी, पेन्सिलचे वाटप केले.

याप्रसंगी नागरिक व त्यांचे मित्र उपस्थित होते. पाटी , पेन्सिलचे वाटप करताना कुंदन पाटील, वि.का.सो.चे. आप्पा पाटील, दगडु पाटील, अरुण पाटील, विश्वास पाटील, अशोक पाटील, बाबाजी पाटील, धर्मराज पाटिल व शिक्षक.